वाशिम / सुनिल कांबळे : सोमवारी गेल्या चारशे वर्षात न दिसलेली एका दुर्मिळ खगोलीय घटनेचे वाशिम कर साक्षीदार बनले. हजारो नागरिकांनी ही खगोलीय घटना आपल्या उघड्या डोळ्यांनी तर काहींनी दुर्बिणीच्या सहाय्याने पाहिली. रात्री साडेसहा ते साडे आठ या वेळेत पश्चिमेला आकाशात तेजस्वी आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आणि शनी एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. हे दृश्य नुसत्या डोळ्यांनी ही पाहता आले. गुरु आणि शनी हे ग्रह जवळ येण्याची घटना दर 20 वर्षांनी घडते. मात्र यावेळी हे ग्रह जितके एकमेकांच्या जवळ आले ते यापूर्वी 400 वर्षांपूर्वी घडले होते. या युतीला ग्रेट कंजेशन असे म्हटले जाते. या पूर्वी असा योग 16 जुलै 1623 ला आला होता. तेव्हा ही घटना खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओने आपल्या दुर्बिणीतून पहिली होती.
जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या जवळ येतात त्याला त्या ग्रहांची युती म्हणतात. त्या दिवशी “गुरू” हा सूर्याची एक परिक्रमा 11.87 वर्षांनी पूर्ण करतो. तर शनिला 29.50 वर्षे लागतात. त्यामुळं सुमारे 19 वर्षे आणि 7 महिन्यांनी या ग्रहांची महायुती होते. मात्र प्रत्येक महायुतीच्या वेळी यांच्यातील अंतरे वेगवेगळी असतात.
चिपी विमानतळाला स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ नाव देण्याची मागणी
सोमवारी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून फक्त ०.1 अंश कोनीय (अर्थात 6 कला आणि 6 विकला) अंतरावर होते. हीच अविस्मरणीय घटना वाशिम येथील खगोल अभ्यासक विशाल दवंडे यांनी आपल्या दुर्बीणमधून पाहण्याची संधी वाशीम येथील खगोलप्रेमींना उपलब्ध करून दिली. ही खगोलीय घटना पाहिल्यानं अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.