पालघर : जिल्हा रस्ते सुरक्षा समिती गठीत करण्यात आली असून या समितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा रस्ते सुरक्षा समिती पालघर यांच्या अध्यक्षतेखाली २८ डिसेंबरला पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १ वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
या बैठकीसाठी जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे सर्व सदस्य, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सुरत हे उपस्थित असणार आहेत. याबाबत जिल्ह्यातल्या नागरिकांच्या या संदर्भात काही सूचना असल्यास त्यांनी homebranchpalghar@gmail.com या ईमेल आयडीवर त्या सुचना २५ डिसेंबर पर्यंत मेल कराव्यात असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलयं.