पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोना विषाणु बाधित रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट जाणवू लागली आहे. 24 तासांत जिल्ह्यात 42 इतक्या नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. त्यात पालघर ग्रामीण भागातल्या 7 आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या 35 रुग्नांचा समावेश आहे.
त्यामुळे जिल्ह्यातली कोव्हिड-19 च्या रुग्णाची आतापर्यंतची एकुण संख्या ही 43 हजार 820 इतकी झाली आहे. त्यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या 28 हजार 845 इतक्या तर पालघर ग्रामीण भागातल्या 14 हजार 975 इतक्या रुग्णांचा समावेश आहे.
तर 24 तासांत दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालायं. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं झालेल्या मृतांची संख्या आता 1176 झाली आहे. उपचारानंतर 24 तासांत जिल्ह्यात कोरोना विषाणु मुक्त झालेल्या 63 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. तर सध्या कोरोना विषाणुनं बाधित 530 रुग्नांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत पालघर ग्रामीण भागात 169 इतकी प्रतिबंधित क्षेत्रे आहेत.