पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसरच्या नांदगाव बीच वरील सांज रिसॉर्ट वर पालघर चे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ आणि पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे आणि त्यांच्या टीमनं रविवारी रात्री पहिली मोठी कारवाई करत 47 जणांना ताब्यात घेतलं आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून रूग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी जिल्हयातल्या सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट आणि सार्वजनिक सभागृह आदी सर्व ठिकाणी धुलीवंदन कार्यक्रम साजरा करण्यास मनाई आदेश लागु केला आहे. मात्र तरी देखील लोकं मनाई आदेशाचं, रात्रीच्या जमावबंदी च्या आदेशाचं उल्लंघन करताना दिसून आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट आणि सार्वजनिक सभागृहात धुलीवंदन कार्यक्रम साजरा करण्यास मनाई
या एक-दोन दिवसांत जिल्ह्याबाहेरचे तसचं जिल्ह्यातले कामानिमित्त बाहेर राहणारे लोकं होळीची धम्माल करण्यासाठी आणि जिल्ह्यात बरेच बीच, रिसॉर्ट असल्यानं पालघर जिल्ह्यात आल्याचं चित्र दिसून येत आहे.