जळगाव / राजेश यावलकर : स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी जळगाव शहरात बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा १ ते ३ जानेवारी दरम्यान हा महोत्सव होत आहे. बालगंधर्व संगीत महोत्सवाला आज संध्याकाळपासून सुरुवात होणार आहे. आज पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध गायिका शरयु दाते यांचे शास्त्रीय गायन तर अश्विन श्रीनिवासन यांचे बासरी वादन होणार आहे.
तर दुसर्या दिवशी येथे कोलकाता येथील ओंकार दादरकर हे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन करणार आहेत. आणि प्रसिद्ध नृत्यांगना शर्वरी जमेनीस बॉलिवुड फुटप्रिंट्स यावर कथक सादरीकरण करणार आहेत. तर ३ जानेवारीला सुश्री मोहंती या ओडिशी नृत्य आणि रघुराजपूर, ओडिशा येथील दशभुजा गोटीपुवा नृत्य परिषदेचे कलावंत गोटीपुवा समुह आपले नृत्य सादर करणार आहेत. त्यातच आम्ही दुनियेचे राजे ही संगितिका सादर केली जाणार आहे.
या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी महापौर भारती सोनवणे, उदयपूर पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक सुधांशू सिंग, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, जनता बँकेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर उपस्थित राहणार आहेत.